झटका मशीन | Zatka Machine information

solar zataka machine kit

झटका मशीन काय आहे ?  झटका मशीनचे फायदे 

               आज आपण या लेखामध्ये झटका मशीन विषयी जाणून घेणार आहोत सध्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांमध्ये झटका मशीन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे बरेच शेतकरी आपल्या शेतातील पीक वन्य प्राण्यांपासून तसेच जनावरांपासून वाचवण्यासाठी झटका मशीनचा वापर करतात जेव्हा बाजारामध्ये झटका मशीन नव्हती तेव्हा शेतकरी आपल्या शेताच्या भोवताली काटेरी तारेचा उपयोग करत होते परंतु त्यातून पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला फायदा होत नव्हता कारण त्या तारेतून प्राणी जाऊन पिकांचे नुकसान करत होते त्यामुळे शेतकरी खूप त्रासून जात होता.

शेतकरी मोठ्या मेहनतीने शेतीमध्ये कष्ट करून पिके घेतात .आणि जर शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांची स्थिती बिघडून जाते. तो आर्थिक संकटामध्ये सापडतो . जंगलातील प्राणी शेतामध्ये घुसून शेतातील पिकांना नुकसान पोहोचतात आणि या प्राण्यांपासून शेतातील पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या शेतीची राखण करावी लागते. आणि 24 घंटे शेतातील पिकांची राखण करणे शेतकऱ्याकडून शक्य होत नाही. आपल्या शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या पर्यायाचा किंवा उपायाचा शोध घेत असतो की ज्यापासून त्याच्या शेतातील पिके प्राण्यांपासून संरक्षित राहील चालू वर्तमान स्थितीमध्ये झटका मशीन शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चित आहे. कारण या मशीन द्वारे आपल्या शेतातील लावलेल्या कुंपणाला एका निश्चित प्रमाणात विद्युत पुरवठा होत असतो ज्यामुळे थोडासा झटका प्राण्यांना बसतो. थोड्याच प्रमाणात बसणाऱ्या झटक्यामुळे प्राण्यांची मृत्यू होत नाही आणि प्राण्यांचा जीवही वाचतो परंतु झटका लागल्यामुळे प्राणी शेतातून दूर पडून जातात.

झटका मशीन | Solar Zatka Kit
zataka machine kit

झटका मशीन काय आहे ?

झटका मशीन वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आकारात बनवत असतात. ही झटका मशीन 12v वोल्ट करंट बनवीत असते. या झटका मशीनमध्ये दोन प्रकारचे वायर दिले असतात एक अर्थ असतो तर दुसरा मेन्स करंट असतो. या तारांचे कनेक्शन शेताच्या चारी दिशेने केले जाते ज्याला फेन्सिंग असे म्हणतात. आणि या तारांमध्ये झटका मशीनद्वारे करंट सोडल्या जाते शेताच्या चारही भोवताली फेंसिंग असल्यामुळे जसा कोणी प्राणी किंवा व्यक्ती या मशीनच्या तारेला स्पर्श करतो त्याला जोरदार असा झटका लागतो तो त्या शेताच्या दूर होतो त्याचप्रमाणे सायरन चा आवाजही होण्याची सुविधा या मशीनमध्ये असते सायरन वाजल्यामुळे शेतातील शेतकऱ्याला माहिती होते की आपल्या फेन्सिंगला कोणी प्राणी किंवा व्यक्ती याचा स्पर्श झालेला आहे. तसेच शेतकऱ्याला हेही माहिती होते की कोणी व्यक्ती किंवा प्राणी आपल्या शेतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. हे झटका मशीन साधारणता सोलर किंवा बॅटरी या आधारे चालवली जाते.

zataka machine kit unboxing

झटका मशीनचे प्रकार 

  • सोलर झटका मशीन
  • बॅटरी पॉवर झटका मशीन

शेतात झटका मशीन लावण्यांची पद्धत ?

शेतात झटका मशीन लावण्याकरता सर्वात आधी शेताच्या चारही बाजूंनी ताराची फेन्सिंग करावी लागते शेताच्या चारही बाजूंनी फेंसिंग करण्याकरता लाकडी किंवा सिमेंटच्या खांबांची आवश्यकता असते. आणि या तारांना आपल्या झटका मशीनच्या तारे सोबत जोडल्या जाते ज्याद्वारे त्यामध्ये विद्युत प्रवाहित होईल आणि तसेच कोणी प्राणी किंवा व्यक्ती त्या तारेला स्पर्श करेल त्याला जोरदार झटका बसेल.

solar zataka machine kit

सोलर झटका मशीन काम कशी करते ?

सोलर झटका मशीन सोलर द्वारे चालणारी झटका मशीन आहे. त्यामध्ये असणारी बॅटरी सोलर प्लेट द्वारे चार्ज केली जाते. ज्यामध्ये सूर्यकिरणाद्वारे सोलर च्या माध्यमातून झटका मशीन मधील बॅटरी चार्ज केली जाते. आणि झटका मशीन मध्ये बॅटरी द्वारे करंट दिला जातो. झटका मशीन ला सोलर असल्यामुळे चार्ज करण्याची किचकट नसते ती ऑटोमॅटिक सूर्यकिनाद्वारे चार्ज होते व संध्याकाळी ऑटोमॅटिक आपल्या फेन्सिंगला करंट चालू करून देते.

झटका मशीन चा उपयोग

शेतकरी आपल्या शेतात पिकांचे संरक्षण करण्याकरिता करतात तसेच या मशीनचा वापर शाळा, हॉस्पिटल, घर यामध्ये चोर किंवा माकड यांच्या त्रासापासून वाचण्याकरता केला जातो.

झटका मशीन वापरण्याची पद्धत​

  • झटका मशीन वापरण्याकरता सर्वप्रथम आपल्या शेताच्या चारही दिशेने लाकडी बांबू किंवा सिमेंट पोल लावून त्यावर फेंसिंग तार ओढावा लागतो.
  • फेन्सिंग तार चार किंवा आठ या संख्येमध्ये आपण लावू शकतो. चारही दिशेने लावल्यानंतर एका काटा कडून अर्थ आणि मेन्स हे दोन्ही तार आपल्या फेन्सिंगच्या तारेला लावावी ज्याद्वारे आपली झटका मशीन जोडल्या जाईल.

झटका मशीन ची किंमत

झटका मशीनची किमतीची गोष्ट कराल तर 3000 हजार रुपये पासून तर 9000 हजार रुपये पर्यंत मिळू शकते. जर आपण या मशीन सोबत सोलर आणि बॅटरी घेतली तर 9000 ते 12000 पर्यंत मिळू शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या झटका मशीन ची किंमत कमी जास्त असू शकते. ही मशीन आपल्या क्वालिटीनुसार पाच एकरापासून चार एकरापर्यंत काम करू शकते.

झटका मशीनची किंमत

 बॅटरीरुपये
12 Volts 7 AH700 से 950
12 Volts 6 AH1350 से 1700
12 Volts 4 AH950 से 1250
12 Volts 3 AH750 से 950

आपण झटका मशीन कुठून खरेदी करू शकतो.

  • ऑनलाइन
  • ऑफलाइन

TOP 5 zatka matchine brand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *